Accident : सहलीला निघालेली पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू

Accident: रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस पुण्याहून कोकणाकडे सहलीसाठी निघाली होती. या बसमधून ५७ प्रवासी प्रवास करीत होते. शनिवारी पहाटे बस माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात (Raigad Bus Accident) आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बस घाटात उलटली.

अपघात इतका भीषण होता, की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ५५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. कोंडेघर गाव हद्दीतील नागरिकही बचावकार्यास पुढे सरसावले.

दरम्यान, अथक प्रयत्नानंतर बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे. अपघातातील मृतांची नावे अद्यापही समोर आलेली नाही. सहलीला निघालेल्या बसचा गेल्या आठवडाभरातील हा दुसरा अपघात आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.