दुर्दैवी ! केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला

धरणगाव :  तालुक्यातील गारखेडा रस्त्यावर नुकताच दुचाकींचा एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघात एक १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चौघे मित्र जात असताना अपघात होऊन दुर्दैवाने यात एक मित्राचा मृत्यू ओढवला.

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रथमेश सुधाकर पाटील (वय १५) आणि त्याचे तीन मित्र दुचाकीवर केक घेण्यासाठी धरणगावला जात होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गारखेडा रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत त्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात प्रथमेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोटारसायकल अपघातात प्रथमेशच्या सोबत असलेले मित्र जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रथमेश हा आपल्या आई-वडिलांसह गारखेडा येथे राहत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्य व मित्र मंडळींमध्ये शोककळा पसरली आहे. प्रथमेश हा सोमवार, १६  रोजी वैभव विठ्ठल देशमुख, हितेश भगवान भोई, शिवराज पंकज पाटील असे सोबत शिक्षण घेणारे चौघे मित्र केक घेण्यासाठी दुचाकीने धरणगाव येथे जात होते. सायंकाळी ७  वाजेच्या समोरासमोर आल्याने दुचाकींचा अपघात झाला. या अपघात प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. परंतु ,  प्रथमच उपचारदरम्यान मृत्यू ओढवला.

विशेषतः मित्राच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी निघालेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रांनी हंबरडा फोडला. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत, आणि अपघाताचे कारण समोर आणण्याचे काम सुरू आहे.