काकोडा येथील सरपंच व शिपायास घरकुलाबाबत तीन हजाराच्या लाचप्रकरणी कारवाई

---Advertisement---

 

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात काकोडा येथील सरपंच तुळशीराम रामा कांबळे व ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेनकर यांनी तक्रारदाराकडे घरकुल बांधकामासाठी उतारा मागणीप्रकरणी ५००० रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात सरपंच कांबळे व शिपाई मेणकर यांनी पंचा समक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (९ डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार हे मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील रहिवासी आहेत. त्यांना घरकुल योजनेंतर्गत बखळ जागेवर घर बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत उतारा हवा होता. त्यासंदर्भात तक्रारदार सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांची भेट घेत, काकोडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना आठचा उतारा देण्यात यावा यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मागणी केली होती.

दरम्यान, सरपंच कांबळे यांनी तक्रारदाराकडे उताराच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार ७ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आदींच्या पथकाने सापळा लावून तक्रारीची पडताळणी केली.

दरम्यान, सरपंच कांबळे यांनी तक्रारदाराच्या नावे काकोडा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक आठ उतारा तयार करून दिला. त्या मोबदल्यात ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेनकर याने पंचासमक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच काकोडा येथील सरपंच कांबळे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याची खात्री झाली, यावरून मंगळवारी ९ डिसेंबर रोजी तीन हजार रुपये लाच मागणीप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---