मुंबई, राजकारणात कोणी कधी प्रवेश करेल, याचा अंदाज लावता येत नाही, त्यामुळे यासंबंधीचे एक मोठे अपडेट समोर आले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. ज्युनियर बच्चनच्या प्रवेशाची शहरात जोरदार चर्चा आहे. मात्र समाजवादी पक्ष किंवा बच्चन कुटुंबाने अद्याप तसे संकेत दिलेले नाहीत.
चित्रपटसृष्टीचे राजकारणाशीही जुने नाते आहे.अमिताभ बच्चन हे देखील याआधी राजकारणात येऊन गेले आहे अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या राजकारणात प्रवेशाच्या बातमीने लोकांची उत्सुकता वाढली आहे. अमिताभ बच्चन यांचे अलाहाबादच्या राजकारणाशी जुने नाते आहे. या जागेवरून अमिताभ बच्चन खासदार झाले असून, त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, नंतर ज्येष्ठ बच्चन यांनी राजीनामा दिला आणि नंतर राजकारणाला अलविदा केला. इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून पराभूत झालेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांची कन्या रिता जोशी आता खासदार आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवल्याच्या बातमीने लोकांची उत्सुकता वाढली आहे. आता ही उत्सुकता सगळयांच्या मनात आहे कि अंभिषेक बच्चन कोणत्या पक्षा कडून निवडणूक लढतील.