अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

#image_title

बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफअली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानच्या वांद्र्यातील राहत्या घरात मध्यरात्री 3 च्या सुमारास हा हल्सुला झाला आहे त्यामुळे त्याच्या सुरक्ष्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री अडीचच्या सुमारास चोर शिरल्याचे लक्षात आले. घरातील नोकरांशी चोराचा वाद सुरु होता. त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला. त्याची चोराशी झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांची विचारपूस

खासदार सुप्रिया सुळे या बारामतीत एका कार्यक्रमासाठी गेल्या आहेत. त्यावेळी त्यांना याबद्दलची माहिती समजली. यानंतर त्यांनी सैफ अलीखानच्या कुटुंबियांशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी कुटुंबियांच्या प्रकृतीची चौकशी केली. सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. सैफ अली खान हे सध्या सुरक्षित आहेत. ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंरच यावर बोलणं योग्य ठरेल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.