Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण…काय आहे कारण ?

Adani Group: अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या समोर आणखी एक नवी समस्या निर्माण झाली आहे. अदानी समूहाची कंपनी किंवा गौतम अदानीसह कंपनीशी संबंधित इतर लोक भारतात ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात गुंतले होते का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे.

खरे तर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अदानी समूहाबाबत तपासाची व्याप्ती वाढवली असून, त्याचा परिणाम समूहाच्या शेअर्सवर होताना दिसत आहे.ऊर्जा प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्यात अदानी ग्रुप किंवा गौतम अदानी यांच्यासह कंपनीशी संबंधित लोकांचा सहभाग होता का, याचा तपास सुरु आहे. यूएस कायद्यानुसार, तपास यंत्रणा परदेशी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाठपुरावा करू शकतात.