अदानी समूहाचा सिमेंट क्षेत्रात दबदबा…’हि’ सिमेंट कंपनी केली खरेदी

#image_title

Adani Buys Orient Cement: अदानी समूहाने सीमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढला आहे. अंबुजा सिमेंटने ओरिएंट सिमेंटचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी अंबुजा सिमेंट 8100 कोटी रुपये खर्च करणार आहे. या करारा नंतर अदानी सिमेंटची एकूण परिचालन क्षमता वार्षिक 97.4 एमटीपीए टन वाढेल आणि कंपनी मार्च 2025 पर्यंत तिची उत्पादन क्षमता 100 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणार आहे.

अदानी समूहाने सांगितले की ओरिएंट सिमेंटच्या अधिग्रहणामुळे अंबुजा सिमेंटला दक्षिण आणि पश्चिम भारतात त्यांची उत्पादन क्षमता वार्षिक 8.5 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्यास मदत होईल. नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की ओरिएंट सिमेंट लिमिटेडच्या 37.90 टक्के समभागांचे 7,76,49,413 इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय, कंपनी 8.90 टक्के स्टेक देखील विकत घेईल जे 1,82,23,750 इक्विटी शेअर्सच्या समान आहे.

याशिवाय, अंबुजा सिमेंट ओरिएट सिमेंटच्या विद्यमान भागधारकांकडून 26 टक्के स्टेक अंतर्गत 5,34,19,567 शेअर्स 395.40 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्याची खुली ऑफर देईल. हे अधिग्रहण 3-4 महिन्यांत पूर्ण होईल.

2028 पर्यंत 140 दशलक्ष टनांचे उद्दिष्ट
ओरिएंट सिमेंटच्या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंटची वार्षिक क्षमता 2025 पर्यंत 100 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. कंपनीने 2028 पर्यंत ते 140 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यापूर्वी, अदानी समूहाने डिसेंबर 2023 मध्ये सांघी सिमेंट लिमिटेडचे ​​अधिग्रहण केले होते. यावर्षी समूहाने पेन्ना सिमेंट खरेदीची घोषणाही केली होती. या संपादनाबाबत अंबुजा सिमेंटचे संचालक करण अदानी म्हणाले, योग्य वेळी केलेल्या या संपादनामुळे अंबुजा सिमेंटच्या वाढीला गती मिळण्यास मदत होईल आणि दोन वर्षांत हि क्षमता 30 दशलक्ष टनांनी वाढवता येईल.