---Advertisement---

गौतम अदानी ‘या’ विदेशी कंपनीचा भारतीय व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत!

by team
---Advertisement---

अदानी ग्रुप दुबईतील रिअल इस्टेट कंपनी एमार ग्रुपची भारतीय युनिट खरेदी करणार आहे. हा करार १.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२०८४ कोटी रुपयांचा असू शकतो. जर हा करार झाला तर अदानी ग्रुपची रिअल इस्टेट कंपनी अदानी रिॲल्टी बिझनेस अंतर्गत हे अधिग्रहण पूर्ण होईल.

असेही म्हटले जात आहे की अदानी रिॲल्टी या व्यवसायात ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४५३ कोटी रुपये) गुंतवणूक करेल. या कराराबाबत अदानी ग्रुप आणि एमार ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे. ब्लूमबर्गने म्हटले आहे की हा करार पुढील महिन्यात अंतिम होऊ शकतो.

जानेवारीपासून सुरू आहेत चर्चा

जानेवारीपासून एम्मार ग्रुप आणि अदानी ग्रुपमध्ये या कराराबाबत चर्चा सुरू आहे. एम्मार ग्रुप भारतात एम्मार इंडिया या नावाने कार्यरत आहे, ज्याचा व्यवसाय दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी सध्या येथे व्यावसायिक प्रकल्पांवर काम करत आहे.

कंपनीने बुर्ज खलिफासह या इमारती बांधल्या आहेत

१९९७ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा व्यवसाय १० देशांमध्ये पसरलेला आहे. त्याने अनेक देशांमध्ये मोठ्या इमारती बांधल्या आहेत. या कंपनीने दुबईमध्ये असलेली जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा बांधली आहे. सर्वात मोठा शॉपिंग मॉल, दुबई मॉल, देखील याच कंपनीने बांधला आहे.

याशिवाय, दुबई मरीना, डाउनटाउन दुबईचा फाउंडेशन एरिया, भारतातील पाम ड्राइव्ह एमराल्ड हिल्स, क्रीक हार्बरमधील नवीन प्रकल्प, इजिप्तमधील पर्यटन रिसॉर्ट, किंग अब्दुल्ला सिटी आणि दुबई हिल्स इस्टेटवर वॉटरफ्रंट घरे आणि दुकाने बांधण्यात आली आहेत.

येईल अदानी समूहाच्या रिअल इस्टेटला मजबूती

एम्मार ग्रुपच्या या करारामुळे गौतम अदानी यांच्या कंपनीचे रिअल्टी क्षेत्रात स्थान अधिक मजबूत होईल. अदानी ग्रुपकडे रिअल इस्टेट व्यवसायात २.४ कोटी चौरस फूट मालमत्ता आहे. कंपनी ६१ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर बांधकाम करत आहे.

अदानींच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ दिसून येत आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अदानी विल्मरचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस लिमिटेड, अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायझेस, अदानी एनर्जी यांचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment