---Advertisement---
---Advertisement---
मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे सीईओ अदार पूनावाला आता चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीचे शेअरहोल्डर बनले आहेत. त्यांनी धर्मा प्रॉडक्शनमध्ये 50 टक्के स्टेक खरेदी केल्याचे वृत्त आहे. पूनावाला यांनी हा करार 1000 कोटी रुपयांना केला आहे.
अदार पूनावालाच्या सेरेन प्रॉडक्शनने करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमध्ये 50 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. यासाठी पूनावाला एक हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या डीलनंतर करण जोहरकडे 50% स्टेक असतील. याशिवाय करण जोहर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. तर अपूर्व मेहता कंपनीचे सीईओ राहतील.