जिल्ह्यातील परवानाधारकांनी शस्त्रे जमा करावीत, अपर जिल्हा दंडाधिकारी शरद पवार यांचे आवाहन

---Advertisement---

 

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे व पिंपळनेर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या कालावधीत तसेच आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती, महापालिकांच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परवानाधारकांनी शस्त्र ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असतील, तेथे जमा करावे, असे अपर जिल्हा दंडाधिकारी शरद पवार यांनी कळविले आहे.

अपर जिल्हा दंडाधिकारी पवार यांनी म्हटले आहे की, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० नोव्हेंबरला बैठक घेण्यात आली होती. बैठकीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील परवानाधारकांची शस्त्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहिता कालावधीत संबंधित पोलीस ठाण्यात जमा होणे आवश्यक आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा वरवाडे, पिंपळनेर या क्षेत्रातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या कालावधीत निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याने सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जीवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील परवानाधारकांनी त्यांनी धारण केलेली शस्त्रे, परवान्यावरील शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावीत, अशा सूचना समिती अध्यक्ष तथा जिल्हा दंडाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांची नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खासगी सुरक्षारक्षकांना शस्त्र जमा करण्याबाबत सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या परवानाधारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणे शक्य नाही, त्यांनी १५ नोव्हेंबरला सायंकाळी पाचपर्यंत जिल्हा दंडाधिकारी तथा समिती अध्यक्ष, गृह शाखा, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्वयंस्पष्ट कारणासह स्वतंत्र अर्ज सादर करावा. त्यानुसार प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरणनिहाय निर्णय घेईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी पवार यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---