अमळनेर : गेल्या १५ जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी) यांचे जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातबेमुदत भव्य बिहऱ्हाड मोर्चा सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास २५ जुलै रोजी अमळनेर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांनी दिला आहे.
चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाज समाजबांधवांना टोकरेकोळी एस.टी जात प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आदिवासी कोळी संघातर्फे अमळनेर प्रांत कार्यायावर बिऱ्हाड मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात सुरु आहे. त्यावेळी निवेदनही देण्यात आले. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य, सचिव भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे, कोळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनवणे, चोपडा तालुका आदिवासी कोळी समाज बांधव तथा वाल्मीक समाज मंडळाचे संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर उपयोगीय प्रांत कार्यालयात कोळी समाजबांधवांना टोकरे कोळी एसटीचे दाखले जात प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही चोपडा, अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांनी आपल्या कार्यालयाकडे टोकरे कोळी अनुसूचित जमातीची दाखले जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रमार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्या अर्जाची आपल्या कार्यालयामार्फत दोन वेळेस तपासणी व सुनावणी झालेली आहे.त्यांनी एक झेरॉक्स प्रत आपल्या दप्तरी जमा केलेले आहे.त्या प्रकरणांना सबळ पुरावे जोडण्यात आलेले आहेत अशा सर्वच प्रलंबित व नवीन ऑनलाईन दाखल होणाऱ्या अर्जाचा निकाल होऊन त्या सर्व अर्जदारांना टोकरे कोळी एसटीचे दाखले जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. अशी मागणी केली आहे यासाठी दोन्ही तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे सोमवारी सकाळी आकरा वाजता अमळनेर येथे तिरंगा चौक पासून ते प्रांत कार्यालयापर्यंत बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. यासाठी जोपर्यंत आम्हाला जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत प्रांत कार्यालयातच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. या बिऱ्हाड मोर्चा व ठीय्या आंदोलनात शेकडे समाज बांधव सहभागी झाले आहेत.
संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी कोळी समाजातील लोकांना टोकरे कोळी (एस. टी. ) प्रवर्गाचे दाखले मिळावे.या मागणीसाठी प्रांतकार्यालय अमळनेर येथे बिऱ्हाड मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहोत. आमच्या मागण्या पुर्ण न झाल्यास गुरुवार, २५ जुलै रोजी कोळी समाज बांधव अमळनेर रेल्वे स्टेशन येथे तप्ती गंगा एक्सप्रेस रेल्वे रोको अंदोलन करू असा इशारा मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, अण्णा आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य नेते जग्गनाथ बापू बाविस्कर, कोळी समाज मंच मंडळ अध्यक्ष मधुकर सोनवणे, महिला अध्यक्ष मंगला सोनवणे, आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, बीआरएस जिल्हाध्यक्ष डॉ. कोमल पाटील, आदिवासी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष सुनीता कोळी, आदिवासी कोळी महासंघ जिल्हाउपाध्यक्ष शोभा कोळी, आदिवासी कोळी महासंघ जिल्हा चिटणीस सोनवणे यांनी दिला आहे.