जळगाव : इयत्ता १०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या अनुषंगाने राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण (महिला) या संस्थेतील विविध व्यवसायाच्या शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रीयेत मुदवाढ देण्यात आली आहे. यानुसार समुदेशन फेरीमध्ये राहिलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेल्या उमेद्वारांना प्रवेश घेता येणार आहे. तरी जास्तीत टेस्ट उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत दि. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. आता उमेदवार राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरुन प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु झाली आहे. या समुपदेशन फेरीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे वरीष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दि. २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत एकत्रित समुपदेशन फेरीमध्ये पूर्वी राहीलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेले उमेदवार यांना प्रवेश घेता येणार आहे.
जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी व निश्चीतसाठी संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.