पंतप्रधान नरेन्द्र मोदी जेव्हा काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढतात तेव्हा त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात, लोकशाही नष्ट करण्याचा आरोप होतो पण भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतःच कबुली देऊनही सर्वोच्च काँग्रेसनेते जेव्हा आपल्या पदाला चिकटूनच राहतात तेव्हा मात्र विरोधी नेते मुखात शाळीग्राम घालून बसतात. तेव्हा मात्र त्याना आपल्या कथित भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा, लोकशाहीप्रेमाचा सोयीस्कर विसर पडतो. याचे दोन प्रकार नुकतेच समोर आले आहेत. एक आहे स्वतः काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आणि दुसरे आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा.काॅग्रेसनेते सत्तेत असले की, आपल्या स्वतःच्या पोळीवर कसे तूप ओढून घेतात, शरद पवारांसारखे ‘जाणते राजे’भूखंडांचे श्रीखंड कसे ओरपतात याची ही उदाहरणे आहेत.ती खरगे वा सिध्दरामय्या यांच्यापुरतीच मर्यादितही नाहीत.अगदी गावपातळीपासून तर केंद्रीय पातळीपर्यंत काँग्रेसनेत्यांचा हाच खाक्या आहे.त्यांच्या कारकीर्दीत देशाचा विकास कमी झाला पण आपल्या सात पिढ्याना पुरेल एवढा भ्रष्टाचार मात्र त्यानी नक्की केला.तो शोधून काढण्यात इडीचीही दमछाक होत आहे.
पहिला भ्रष्टाचार उघडकीस आला तो कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दयारमय्या यांच्या पत्नीचा.सिध्दरामय्या राहणारे म्हैसूरचे.आपल्याकडे जशी नासुप्र किंवा एमयडीसी आहे तशी कर्नाटकात म्हैसूर येथे म्हैसूर डेव्हलपमेंट अॅथारिटी आहे.ती जमीन विकसित करते .तिचे प्लाॅट पाडले व उद्योजकाना वा गरजूना विकते. त्यातील तब्बल चौदा प्लाॅट सिध्दरामय्या यांच्या पत्नीच्या एकटीच्या नावावर अलाॅट करण्यात आले.त्याचा हेतू हाच की.ते स्वस्त दराने घ्यायचे व चढ्या दराने विकून नफा कमवायचा.पण भाजपनेत्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यानी प्रकरण उचलून धरले व थेट लोकायुक्ताकडे तक्रार केली.लोकायुक्तानी चौकसी सुरू करताच सिध्दरामय्यांची पंढरी घाबरली आणि आपल्या पत्नीला ते प्लाॅट म्हैसूर डेव्हलपमेंटकडे परत करावयास सांगितले.याचा अर्थ असाच की, ते अठरा प्लाॅट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावाने लाटण्यात आले.बोंबाबोंम झाल्यामुळे फक्त ते परत करण्याची उपरती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला झाली म्हणून त्यानी ते 14 प्लाॅट म्हैसूर, डेव्हलपमेंद अॅथारिटीला परत करण्याचा निर्णय घेतला.
दुसरे प्रकरण तर खुद्द काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे आहे. त्यांच्या राहुल नावाच्या मुलाने आपल्या संस्थेसाठी तब्बल पाच एकर जमीन सरकारकडे मागितली आणि त्याना ती लगेच मिळालीही.आता त्यांचा भ्रष्टाचार जेव्हा उघडकीस आला तेव्हा त्याना ती जमीन परत करण्याची उपरती झाली. वस्तुतः त्याना त्या प्लाॅटचा आणि जमिनीचा लोकांसाठी काही उपयोग करायचा असता तर प्लाॅट आणि जमीन परत करण्याची गरज नव्हती पण प्रकरण आपले पती व पिताश्री यांच्यावर शेकू शकते हे लक्षात येताच त्यानी ते परत करण्याचा निर्णय घेतला.आता हा गुन्हा ठरतो काय हे कायद्यातील तज्ज्ञ ठरवितील पण हा अनैतिक व्यवहार होता हे निश्चितच सिध्द झाले आहे. अदाणी, अंबानी आणि मोदी यांची नावे घेताना जे कधीही थकत नाहीत,ते काॅग्रेसचे युवराज मात्र शांत आहे.बहुधा त्याना बोबडी वळण्याची भीती वाटत असावी.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर