पालकमंत्र्यांच्या हस्ते ऍड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात शालेय साहित्य वाटप

जळगाव : ऍड. बबनभाऊ बाहेती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला उपक्रम आजही पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगून आपल्या अवती  भोवतीचे कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्याम कोगटा व रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होवून अभ्यास करावा, यश तुमच्या हातात आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ऍड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व कान्ताई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला आ. सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात  दरवर्षाप्रमाणे सुमारे ५ हजार विद्यर्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यर्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

प्रास्ताविक बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कोगटा यांनी केली. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले. आभार नगरसेवक मनोज चौधरी यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती

माजी नगरसेवक मनोज चौधरी, गणेश सोनवणे,  नितीन बरडे, क्रीडा रसिक एजुकेशन सोसायटीचे सचिव ऍड. रोहन बाहेती, क्रीडा संचालक प्रा. सतीश कोगटा, प्राचार्य अनिल लोहार, माजी सभापती जनाआप्पा कोळी, उद्योजक रजनीकांत शहा , महेंद्र कोठारी, संतोष पाटील , ऍड. रोहन बाहेती, बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कोगटा, माजी नगरसेवक राजू मोरे, पवन ठाकूर, विजय पाटील, विशाल निकम, किरण राजपूत यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.