जळगाव : येथील मविप्र संस्थेच्या बनावट दस्तऐवज प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली. ॲड. पाटील यांना आज एम.एम. बढे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव येथील मविप्र संस्थेच्या कार्यालयात येऊन कागदपत्रं जबरीने नेले तसेच बनावट दस्तऐवज करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रविवार, १५ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अॅड. विजय पाटील, त्यांचे बंधू संजय पाटील या दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.. दरम्यान आज सोमवार, १६ रोजी ॲड. विजय पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
१९ जुलै २०२१ रोजीची ही भागनड आहे. या प्रकरणाशी संबंधित विषयात बनावट दस्तऐवजांच्या आधारे आदेश काढले म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील तसेच दबावतंत्रातून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला म्हणून तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध मविप्र संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला. तक्रारीत म्हटले की, संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्या जागी अॅड. विजय पाटील, संजय पाटील यांच्याकडून त्यांच्या गटातील तसेच विश्वासातील लोकांना संस्थेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९ जुलै २०२१ रोजी
नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात अॅड. विजय पाटील त्यांच्या समर्थकांनी अनधिकृत प्रवेश केला. प्राचार्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत कार्यालयातून कागदपत्र तसेच रजिष्टर चोरून नेले. शिक्षकांना शिवीगाळ केली. तक्रारीनुसार पोलीस चौकशीतून हे एक कटकारस्थान होते आणि यामध्ये अॅड. चव्हाण विद्यापीठाचे कुलगरू पाटील हेही सहभागी झाल्याचे समोर आले, असे भोईटे यांनी नमूद केले आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची सीबीआयने चौकशी केली. ३० डिसेंबर २०२३ रोजी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. ही तक्रार अॅड. विजय पाटील यांनी दिली होती. त्यात नीलेश भोईटे यांना आरोपी संबोधले होते. अॅड. विजय पाटील यांनी याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक यांच्यावर दबाव आणल्याचे यातून स्पष्ट झाले. या कट कारस्थानात अॅड. पाटील यांना अॅड. चव्हाण यांची साथ लाभली. काही साक्षीदारांचे जबाब स्वतःच तयार करून घेतले. आमदार गिरीश महाजन यांना मोक्का कायद्याखाली गुंतविण्यासाठी खटाटोप करण्यात आला होता, असेही या तक्रारीत नीलेश भोईटे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अॅड. विजय पाटील, संजय पाटील, विनोद पाटील, अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज सोमवर, १६ रोजी ॲड विजय पाटील यांना एम.एम. बढे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.