’12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे…’, अखेर त्याने घेतला मोठा निर्णय

#image_title

युगांडा: आपल्या देशात वाढती लोकसंख्या हा केवळ सामाजिकच नाही तर राजकीय मुद्दाही बनला आहे. यावर दररोज चर्चा होत असते. मात्र आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या भल्यामोठ्या कुटुंबाविषयी वाचून तुम्हाला धक्काच बसेल. या व्यक्तीच्या एक, दोन नाही तर १२ पत्नी आहेत. या १२ बायकांपासून त्याला तब्बल १०२ मुलं आहेत. या व्यक्तीच्या नातवंडांचा आकडा वाचून तुमचे डोळेच विस्फारतील. १२ बायका, १०२ मुलं आणि ५६८ नातवंडांनंतर अखेर त्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १०२ मुलांचं संगोपन करणारी ही व्यक्ती पेशाने शेतकरी आहे.

युगांडामधील या शेतकऱ्याचं नाव आहे मुसा हसाह्या. मुसा यांच्या भल्यामोठ्या कुटुंबाची चर्चा जगभरात आहे. इतक्या मोठ्या परिवारानंतर त्यांनी अखेर त्यांच्या सर्व पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या वापरण्यास सांगितलं आहे. मुसा हे ६७ वर्षांचे आहेत. कुटुंबाच्या पालनपोषणसाठी समस्या येत असल्याने त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला.

“राहणीमानाचा खर्च वाढत असल्याने माझं उत्पन्न कुटुंबासाठी कमी पडतंय. माझं कुटुंब आता इतकं मोठं झालंय की त्या सर्वांचं पालनपोषण माझ्या उत्पन्नात होऊ शकणार नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे”, असं मुसा म्हणाले.

मुसा हे युगांडातील लुसाका शहरात राहतात आणि तिथे एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करणं कायद्याने गुन्हा नाही. याच कारणामुळे ते एकानंतर एक लग्न करत गेले आणि आता त्यांच्या एकूण १२ पत्नी आहेत. “फक्त एकाच महिलेसोबत पुरुष कसा काय समाधानी असू शकतो”, असा सवाल त्यांनी याविषयी बोलताना केला.

विशेष म्हणजे मुसा यांच्या बाराही बायका एकाच घरात राहतात. जेणेकरून त्या सर्वांवर लक्ष ठेवता येईल, यासाठी त्या सगळ्यांना सोबत ठेवण्याचा निर्णय मुसा यांनी घेतला. त्यांची सर्वांत छोटी पत्नी जुलैका हिला ११ मुलं आहेत. तर त्यांची एक तृतीयांश मुलं ही ६ ते ५१ वर्षांदरम्यानची आहेत. ही सर्व मुलं त्यांच्यासोबत मिळून शेतात काम करतात.

मुसा यांचा सर्वांत मोठा मुलगा हा ११ व्या पत्नीपेक्षा २१ वर्षांनी मोठा आहे. गरीबीमुळे मुसा यांच्या दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या आहेत. तर इतर बायकांनी आता गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लुसाका शहरात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा वापर करणं योग्य मानलं जात नाही.