जालना : गेल्या अनेक दिवसांना पासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन व मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळी पोहोचतात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळे गेले १७ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण आता थांबणार आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की..
मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे घेणार नाही. समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय, असं जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे. असे असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं . त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यात यश आलं असलं, तर आंदोलनाबाबत त्यांना काळजी घ्यावीच लागणार आहे.