कोलकाता : रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा हिंसा उफाळून आली होती. शिवपूर पोलीस ठाण्यानजीक गुरुवारी हिंसाचार उफाळून आला होता. त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळीच अचानक दगडफेक करण्यात आली. पोलीसांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला. प्रसारमाध्यमांवर ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
या दंगलींच्या मागे नेमके कोण आहे, असा सवाल विचारला जात आहे. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकाराला राजकीय रंग देण्याची सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांचे हे काम असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, पोलीसांच्या समोर दंगली घडत असताना बघ्याची भूमिका का घेतली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. लाईव्ह वार्तांकन सुरू असतानाच ही दगडफेक करण्यात आली. कट्टरतावाद्यांकडून बाजारपेठांची नासधूस आणि दगडफेक सुरूच होती.