जळगाव : शहरात ग्रामीण भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच रणगाव शहरातील पारधी वाड्यात तीन घरात डल्ला मारल्याचा प्रकार समोर आली आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव शहरातील पारधी वाडा येथे एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे रा. पारधी वाडा, धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले, यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असताना कशानेतरी रूमाल सुगवून बेशुध्द केले.
लोखंडी कपाटातील २० हजार रूपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल लांबविला. शिवाय याच परिसरातील इतर दोन ठिकाणी चोरी केली परंतू चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी मधुकर दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच परिसरात अनेकवेळा चोरी झालेल्या आहे. पोलीसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.