---Advertisement---

jalgaon news: पित्यानंतर चिमुकल्याचे मातृछत्रही हरपले

by team
---Advertisement---

 जळगाव :दुचाकीसमोर अचानक कुत्रे आल्यानंतर दुचाकीस्वाराने ब्रेक लावताच अपघात झाल्याने 30 वर्षीय विवाहिता ठार झाल्याची घटना  जळगाव  तालुक्यातील म्हसावद फाट्याजवळ घडली. हा अपघात शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला.  चित्राबाई शालिग्राम पाटील (30, रा.ताडेपुरा, अमळनेर) असे मयत महिलेचेे नाव आहे.

आधी पित्याचा नंतर आईचा मृत्यू

चित्राबाई शालीग्राम पाटील (30, रा. ताडेपुरा, अमळनेर) या  शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने म्हसावद फाट्याजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा आला व चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरल्याने चित्राबाई खाली पडताच डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्या. मयत महिलेच्या पश्चात मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे. चित्राबाई यांचे पती शालिग्राम पाटील यांचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले होते. दोन महिन्यापूर्वीच पितृछत्र हरविलेल्या दोन्ही मुलांचे आता मातृतछत्रही हिरावले गेल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment