मनपा निवडणुकीची किनार, पुन्हा सहा जण तडीपार

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून जोरदार अॅक्शन घेण्यात येत आहे. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा जणांना रविवारी (११ जानेवारी) ते शुक्रवारी (१६ जानेवारी) पर्यंत शहरातून तडीपार करण्याचे आदेश जळगाव भागचे उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी बजावले आहेत.

गुन्हे दाखल असलेले हे संशयित शहरात वावरल्यास सामान्य जनतेत दहशत पसरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे या उपद्रवशील लोकांबद्दल पोलिसांनी टिप्पणी करत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार प्रातांधिकारी यांनी संशयितांच्या प्रस्तावावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (२) नुसार कारवाई केली. संशयितांना मंगळवारी (१३ जानेवारी) मध्यरात्रीपासून ते शनिवारी (१७ जानेवारी) सकाळी आठ वाजेपावेतो शहर हद्दीत येण्यातून तडीपार करत मज्जाव केल्याचे आदेश काढले. गुरुवारी (१५ जानेवारी) मनपा निवडणुकीत मतदानासाठी दोन तास शहरात येण्याची परवानगी देताना, मतदान झाल्यानंतर तत्काळ जळगाव शहर सोडुन जाण्याचे आदेशात नमूद केले आहे.

तडीपार केलेल्यांमध्ये रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील फैजल खान असलम खान (रा. गर्जना चौक, पिंप्राळा), लकि उर्फ झेलसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधीनगर), गोकुळ बळीराम सोनवणे (रा. समतानगर) तसेच विक्की महेंद्र कोळी (रा. समतानगर) यांचा समावेश आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याकडून प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आला होता. अवलोकनाअंती हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला होता.

शहर पोलीस ठाणे हद्दीतील याकुबखान दाउतखान उर्फ बांगी (रा. शाहुनगर) तसेच मुकेश उर्फ आबा रमेश बाविस्कर (रा. नेहरु चौक) दोन संशयितांसदंर्भात प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता. अवलोकनाअंती दोघांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले होते. या प्रस्तावावर प्रातांधिकारी विनय गोसावी यांनी आदेश केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---