जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत सभागृहात केलेल्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मंगळवारी भारतीय जनता युवा मोर्चा महानगरतर्फे काँग्रेस भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी मनोरुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केले. या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी हे लोक करत होते. जळगाव महानगर महामंत्री डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, जितेंद्र मराठे, युवा मोर्चां उपाध्यक्ष, महामंत्री तसेच सचिव व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत भाजपवर भाष्य केले होते.