---Advertisement---

Dhule Bribe Case : मंजूर विहिरीच्या कामासाठी लाच घेताना कृषी विस्ताराधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

शिरपूर : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदान प्रक्रियेत लाच घेण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. शिरपूर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याने विहिरीचे लाइन आउट करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्याने तक्रार दाखल केली होती

शिरपूर तालुक्यातील बुडकी येथील तक्रारदाराच्या आईच्या नावावर सांगवी (ता. शिरपूर) वनक्षेत्रात जमीन आहे. त्या ठिकाणी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२२ अंतर्गत विहीर खोदण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. शासनाने या अर्जाला मान्यता देत चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. अनुदान मिळाल्यानंतर शिरपूर पंचायत समितीचा कृषी विस्तार अधिकारी योगेशकुमार शांताराम पाटील (वय ४६) याने नियोजित जागेची पाहणी करून तक्रारदार आणि त्याच्या आईचे छायाचित्र काढून घेतले. मात्र विहिरीचे लाइन आउट करण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणांमुळे रुपया आणि शेअर बाजार कोसळला; सोने सर्वकालीन उच्चांकी पातळीवर

शेतकऱ्याने ही बाब धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबी पथकाने बोराडी येथील स्टेट बँक परिसरात सापळा रचला.

लाच घेताना रंगेहाथ पकडले

योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाच्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्याला दबाव टाकून लाच मागितल्याच्या प्रकरणात कृषी विस्तार अधिकारी योगेशकुमार पाटील याला ९ फेब्रुवारी रोजी बोराडी येथील स्टेट बँक परिसरात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्याला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक एसीबीच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment