‘आई न तू वैरीण’ मुलगाच हवा म्हूणन आईने केले असे काही…

Crime News: सामाज्यमध्ये आता मुलगा आणि मुलगी या वतरी खुप प्रमाणात जागृती करण्यात आलेली आहे.आता बरचसे पालकांना एकाच मुलगी देखील आहे, पण अजून देखील सामाज्यात बरेचसे लोक मुलगाच पाहिजे असा हट्ट करतात.मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, अशी काहींची समजूत असते. अश्यातच एक घटना समोर आली आहे.मुलगाच हवा म्हणून एक आईने आपल्याच पोटच्या ४ महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे.त्या महिलेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. याचिकाकर्ती महिलेविरुद्धचे प्रकरण हे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. शिवाय, याप्रकरणी आरोप निश्चितीही झालेली नाही. त्यामुळे हा खटला पूर्णत्वास जाण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो.

तसेच आरोपी ही महिला असून ती एक वर्ष अकरा महिने या कालाधीपासून कारागृहातच आहे. तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्भूमी नाही. अशा परिस्थितीत याचिकाकर्ती महिलेला आणखी काही काळ कारागृहात ठेवले तर ते खटला चालवण्यापूर्वीच तिला शिक्षा सुनावण्यासारखे आहे. असे निरीक्षण न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने नोंदवले. आणि याचिकाकर्ती सपना मकदूम हिला जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण ?

याचिकाकर्ती सपना मकदूम हिने तिची अवघी काही महिन्यांती मुलगी चोरीला गेल्याची तक्रार काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नोव्हेंबर 2021 रोजी एक महिला जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी विकण्यासाठी तिच्या घरी आली आणि मला बेशुद्ध करून चार महिन्यांच्या मुलीला घेऊन पसार झाली , असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि कसून चौकशी केली तेव्हा आपणच मुलीचा जीव घेतला याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली. मला पहिली मुलगीच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा होती. पण पोटी पुन्हा मुलगीच आली. यामुळेच मी मुलीची हत्या केली, असे तिने पोलिसांसमोर कबूल केलं. पाण्याच्या टाकीत बुडवून तिचा जीव घेतल्याचे तिने सांगितले.

यानंतर पोलिसांनी तातडीने तिला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ती तुरूंगातच आहे. जामीनासाठी तिने सत्र न्यायालयात अर्ज केला होता, पण तेथे जामीन मिळाला नाही. अखेर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी तिला जामीन मंजूर केला.