कृत्रिम बुद्धिमत्ता : उपयाेग आणि आवश्यकता

#image_title

AI-use-need-India गेल्या वर्षाअखेर म्हणजेच 2 ते 4 डिसेंबर 2024 दरम्यान बेलग्रेड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयाेजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा वैचारिक परिषदेचे आयाेजन केल्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : उपयाेग आणि त्याची व्यावसायिक आवश्यकता’ या विषयावर व्यापक चर्चा झाली. याचाच पाठपुरावा म्हणून केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान व उच्च-शिक्षण विभागातर्फे 2025 वर्ष हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष’ म्हणून पाळण्याचा व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयाेजन करण्याचा महत्त्वपूर्ण व धाेरणात्मक निर्णय घेतल्याने या विषयाचे महत्त्व नव्या संदर्भात अधाेरेखित झाले आहे.

याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य उद्याेग व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयार्ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-सर्वांसाठी’ नावाचे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये केवळ उद्याेग-व्यापार व व्यवसाय यांच्याशीच नव्हे, तर समाजातील सर्व क्षेत्रांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे हे विशेष. यामध्ये मेट्राे-महानगरांपासून शहर-गाव व ग्रामीण क्षेत्राचा अंतर्भाव केला जाणार आहे. त्यामुळेच भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रसार-प्रचार व उपयाेग करताना आराेग्य व वैद्यक सेवा, कृषी व संबंधित क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने विशेषतः ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवाद-संपर्क निर्माण करणे व वैद्यकीय सेवांसह विविध साधनांना बळकटी देणे इ. शक्य हाेणार आहे.

Nari Shakti Half page

यासंदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित व नुकताच साध्य झालेला उपक्रम म्हणून ‘किसान-ई-मित्र’ याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यामध्ये विविध भाैगाेलिक क्षेत्रातील व विविध प्रकारे आणि विविध प्रकारची शेती व फलाेत्पादन, भाजीपाला लागवड विविध प्रकारचे वातावरण, शेतजमीन व पर्जन्यमानासह करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट व संवादासह सल्ला-मार्गदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हे विशेष. मुख्य म्हणजे असा थेट सल्ला मिळण्यासाठी पुरेसे ठरणार असल्याने त्याच्या वापरामध्ये संबंधित शेतकऱ्याला सुलभता लाभणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे इच्छित व अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी केंद्र सरकारर्ते जी विशेष उपाययाेजना केली आहे त्यामधील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी क्षमता विकास, उपाययाेजना : कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक स्वरूपात वापर करण्यासाठी आवश्यक ते मूलभूत सुविधा तंत्रज्ञान व काैशल्य उपलब्ध करून त्याद्वारा क्षमता विकास साधणे.
कृत्रिम बुद्धिमत्तेला कल्पकतेची जाेड : कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतीय व देशी शिक्षण-संशाेधनाची जाेड देण्यासाठी कल्पकतापूर्ण विकास केंद्रांची स्थापना करणे.
माहिती संचय संग्रहाचा प्रगत वापर : संगणकीय पद्धती व माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगत कार्यपद्धतीचा विकास व वापर करणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेची विकासाशी सांगड घालणे : भारताची सध्याची विकसनशील स्थिती व नजीकच्या काळातील विकासाचा वेग याचा अद्ययावत ताळमेळ घालणे.
काैशल्य विकासात वाढ साधणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने त्या नव्या व प्रगतिशील काैशल्य विकासाला गतिमान करणे.
नवागतांना वित्तीय साहाय्य : कृत्रिम बुद्धिमत्ता हे मुळातच नवे क्षेत्र असल्याने त्यामध्ये नव्याने प्रवेश करून काम करणाऱ्यांना ‘स्टार्ट अप’च्या स्तरावर वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे.
सुरक्षित व विश्वासार्ह बनविणे : प्रगत माहिती तंत्रज्ञान व संगणकीय पद्धती यांना संशाेधनाची जाेड देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला भारतात सुरक्षित व सर्वांसाठी विश्वासार्ह असे साधन बनविणे.
केंद्र सरकारच्या वरील प्रकारच्या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे परिणाम याेजनाकारांच्या मते पुढीलप्रमाणे अपेक्षित आहेत.

आर्थिक क्षेत्रातील लवचीक स्वायत्तता : कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा व्यापार-व्यवसाय पद्धती अधिक गतिमान हाेऊन त्याचा परिणाम उद्याेग-व्यवसायाच्या आर्थिक प्रगतीच्या संदर्भात अधिक सकारात्मक व पूरक स्वरूपात हाेऊ शकताे. .
काैशल्य विकासातून कर्मचारी व कामाचा विकास : नव्याने विकसित हाेणारे क्षेत्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडित क्षेत्रांमध्ये काैशल्य विकासाला माेठा वाव राहणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे 3.3 लाख जणांना या क्षेत्राशी निगडित काैशल्य विकासाचा लाभ झाला आहे. सरकारचे धाेरणात्मक निर्णय व त्याला उद्याेग-व्यवसायांची सकारात्मक साथ यामुळे भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडित क्षेत्रात आघाडी घेतली आहे. याचा पण आर्थिक व व्यावसायिक लाभ भारत आणि भारतीयांना हाेणार आहे. ग्रॅनाेर्डच्या 2024 च्या अहवालात तर भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य केंद्र म्हणून घाेषित करण्यात आले आहे.

आराेग्य सेवेमध्ये विशेष सुधारणा : कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा भारतातील वैद्यक क्षेत्र व रुग्णसेवा क्षेत्रात लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. काेराेना काळाच्या पृष्ठभूमीवर आराेग्य सेवा क्षेत्रात घडून येणारे हे परिवर्तन माेठ्या अर्थाने लक्षणीय व परिणामकारक ठरणार आहे. देशांतर्गत आराेग्य क्षेत्रात प्रगत स्वरूपात व परिणामकारक बदल करण्यासाठी राष्ट्रीय आराेग्य संस्था व इंडियन इन्स्टिट्युट ऑ\ टेक्नाॅलाॅजी कानपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा विशेष प्रकल्प आणि प्रयत्न साकारला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता व शिक्षण क्षेत्र : सरकारचे नवे शैक्षणिक धाेरण व त्याच्या अंमलबजावणीला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयाेगाची परिणामकारक साथ मिळाली आहे. याचे दृश्य व सर्वांत प्रमुख उदाहरण म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑ\ टेक्नाॅलाॅजीद्वारा साेपा व दृक्-श्राव्य स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक विशेष अभ्यासक्रमांचा उल्लेख करावा लागेल. यातूनच कर्नाटकमध्ये ‘शिक्षा-पायलट’ या अभिनव याेजनेची सुरुवात हाेणे याचे श्रेय कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी संबंधित प्रयत्नांना जाते.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी व ग्रामीण विकास : भारत आणि भारताच्या आर्थिक-सामाजिक संदर्भात महत्त्वाच्या अशा कृषी व ग्राम विकास क्षेत्राला आता पूर्वापार प्रयत्नांच्या जाेडीलाच कृत्रिम बुद्धिमत्तेची आता व परिणामकारक साथ लाभली.
 कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा परिणामकारक प्रशासन : बदलता काळ, बदलत्या अपेक्षा व जनमानस यांचा याेग्य ताळमेळ साधून परिणामकारक प्रशासन व्यवस्था साकारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर परिणामकारक ठरला आहे. यामुळे शासन-प्रशासन व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक हाेत आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. थाेडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवे क्षेत्र विकसित व अधिकाधिक प्रचलित-प्रचारित हाेत असल्याने त्याचे दृश्य व ायदेशीर परिणाम आता निश्चितपणे दिसू लागले आहेत.