---Advertisement---
---Advertisement---
मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमआयटीई) डिजिटल समावेशन उपक्रमांतर्गत, कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) आणि एआय सीआरएम व सेल्सफोर्स यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागांतील नागरिकांना तसेच ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना (व्हीएलई) बुद्धिमान आणि विस्तारयोग्य सेवा अनुभव देण्यासाठी एकसंघ, एआयसक्षम तक्रार निवारण व्यासपीठ प्रदान करण्यासाठी भागीदारी केली आहे.
या माध्यमातून तक्रार निवारणासाठी लागणारा वेळ कमी होईल, व्हीएलईना आधुनिक साधनांचा लाभ मिळेल, तर नागरिक सेवांमध्ये अधिक पारदर्शकता व विश्वास निर्माण होईल. सेल्सफोर्स प्लॅटफॉर्मवर विकसित केलेले हे समाधान व्हॉट्सअॅप, ई-मेल, एसएमएस आणि सीएससी पोर्टलद्वारे नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करते. चोवीस तास स्वयंसेवा व डिजिटल सह भागासाठी ‘आइन्स्टाईन बॉट्स’सारखी एआय उपकरणे आणि ‘सर्व्हिस क्लाऊड’ यांचा वापर केला जातो.
सीएससी एसपीव्हीचे एमडी संजय कुमार राकेश म्हणाले की, सीएससीमध्ये आम्ही नागरिक आणि व्हीएलईना सक्षम बनवून शेवटच्या टप्प्यातील डिजिटल दरी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. सेल्सफोर्ससोबतचे हे सहकार्य अधिक प्रतिसादशील, एकत्रित आणि डेटा-चालित तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
आम्ही आमच्या फ्रंटलाइन नेटवर्कला एआयआधारित वर्कफ्लोसह आधुनिक साधने प्रदान करत आहोत, जेणेकरून समस्या जलद सोडवता येतील, त्यांचा पारदर्शकपणे मागोवा घेता येईल आणि आमच्या समुदायांना चांगला अनुभव मिळेल. हे केवळ तंत्रज्ञानातील अपग्रेड नाही तर डिजिटल प्रशासनावर विश्वास निर्माण करण्याच्या पद्धतीत एक परिवर्तन आहे.