Airtel : एअरटेल युजर्सला मोठा झटका! कंपनीने ‘या’ दोन प्रीपेड प्लॅनमध्ये केली वाढ

Airtel : एअरटेल कंपनीचं सिमकार्ड वापरकर्त्यांच्या खिशावरील भार वाढणार आहे. भारती एअरटेल कंपनीने दोन प्रीपेड प्लॅनमध्ये वाढ केली आहे. यामुळे एअरटेल युजर्सला मोठा झटका बसला आहे. याबाबतची माहिती भारती एअरटेल टेलिकॉम कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

118 रुपयांचा प्लॅन आता 129 रुपयांना
एअरटेलचा 118 रुपयांचा प्लॅन आता 129 रुपयांना मिळेल. या प्लॅनमध्ये 12GB डेटा मिळेल. वापरकर्ते त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या वैधतेदरम्यान कधीही हा डेटा वापरू शकतात. या 12 GB डेटाची वैधता युजर्सच्या अॅक्टिव्ह प्रीपेड प्लॅनसारखीच असेल. एअरटेल युजर्सना या प्लॅनसह इतर कोणताही लाभ मिळणार नाही. दरम्यान, या प्रीपेड टॅरिफ प्लॅनची ​​किंमत आधी 118 रुपये होती, त्यानुसार इंटरनेट डेटाची किंमत 9.83 रुपये प्रति जीबी होती, पण आता या प्लॅनची किंमत वाढल्यानंतर, डेटाची किंमत 10.75 रुपये प्रति जीबी असेल.

289 रुपयांचा प्लॅन आता 329 रुपयांना
यापूर्वी या प्रीपेड टॅरिफ प्लानची किंमत 289 रुपये होती. या प्लॅनमध्ये यूजर्सना 35 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 4GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळते. याशिवाय, या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Airtel Thanks App ची सुविधा मिळते. यासह, एअरटेल युजर्सना Apollo 24|7 मंडळ सदस्यता, मोफत HelloTunes आणि Wynk Music मिळते.