पाचोरा : नाशिकच्या सूक्ष्मचित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या घरी गेली ५ वर्ष गणपतीची स्थापना होते. तर गेले ५ वर्ष आपला गणपती इको फ्रेंडली बाप्पा असावा याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्यामुळे ते बाप्पाबरोबर बाप्पाची आरासही इको-फ्रेंडली असण्यावर भर देतात. वसुंधरेचा म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यासाठी नातेवाईक व दरशांनार्थी इको फ्रेंडलीबद्दल माहिती देऊन पर्यावरण पुरक गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत
ऐश्वर्या औसरकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अष्टविनायकांपैकी सर्व आठ गणपती बाप्पांचे चित्र तीळ वर रेखाटून यावर्षी जगातील सर्वात लहान व डोळ्यांना ही न दिसणारा लहान गणपती बाप्पांचे दर्शन नाशिककरांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.
यात या अष्टविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांना भिंगाचा काचेचा वापर करावा लागत आहे. सोबतच जगातील सर्वात लहान गणपती बाबा पाहण्याचा सुवर्णयोग नाशिककरांना मिळालेला आहे. ऐश्वर्या यांनी रेखाटलेल्या देखाव्याचे नाशिककर कौतुक करत आहेत. डोळ्यांना ही न दिसणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी एकच गर्दी त्यांच्या घरी केली आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास न व्हावा सोबतच पर्यावरण पूरक गणपतीचे स्थापना करून त्यांनी एक पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या कलेच्या माध्यमातून केला आहे. निसर्गप्रेमी व प्राणी पक्षिंवरील प्रेम करणारा गणपती बाप्पा आणि मानवाच्या चुकांमुळे पर्यावरणाचा होणारा रास हे सर्व एकत्र चित्र त्यांनी आपल्या देखाव्यातून दाखवले आहे त्यामुळे ऐश्वर्या औसरकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.