NCP Candidates: दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध कोणता ‘उमेदवार’?

#image_title

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांनी आज आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची हि तिसरी यादी जाहीर केली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 23 ऑक्टोबरला 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पुढे 25 ऑक्टोबरला 7 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये निशिकांत पाटील, झिशान सिद्दीकी, सना मलिक, प्रताप पाटील चिखलीकर, माऊली कटके आणि सुनील टिंगर, यांच्या नावाचा समावेश होता.

अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात असून यादीमुळे फलटन मतदार संघातील वाद मिटला असल्याचे समोर आले. फलटन मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे दिगंबर आगवणे यांनी तयारी सुरु केली होती. परंतु आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे.

अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची जाहीर केली आहे. यामध्ये फलटणमधून सचिन सुधाकर कांबळे, बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारणेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांचा समावेश आहे.