तरुण भारत लाईव्ह: छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल अपमानजनक विधान करणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याविरोधात चोपडा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणा देऊन अजित पवारांचा कडक शब्दात जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक, शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन,कामगार आघाडी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,संदिप चव्हाण, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष भरत पाटील, विवेक गुजर, ओबीसी तालुका उपाध्यक्ष योगेश महाजन, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सागर चौधरी, शक्तिकेंद्र प्रमुख शेखर ठाकरे, सोशल मीडिया अॅपप्रमुख धर्मदास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.