अजित पवारांचा काँग्रेसला धक्का! ‘या’ आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : निधानसभा निवडणुकीचे कुठल्याही क्षणी बिगुल वाजू शकते. अशातच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  अशातच विविध पक्षात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु असतांनाच अजित पवार गटाच्या जाळ्याला काँग्रेसचा आमदार लागला आहे. अशातच विधान परिषदच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर चर्चेत आले होते. काँग्रेस पक्षाने खोसकारांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची त्यांना चाहूल लागली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता खोसकारांनी मोठा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे हिरामण खोसकर यांनी आता विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यातच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दीला आहे. काँग्रेसचे इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

काँग्रेसचे इगतपुरीचे विद्यमान आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी सोमवार दि. १४ रोजी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्य उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. आमदार हिरामण खोसकर यांच्यासह माजी जिल्हा उपाध्यक्ष संपत सकाळे, जनार्दन माळी, संदीप गोपाळ गुळवे, उदय जाधव, दिलीप चौधरी, मार्केट कमिटीचे माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला.

दरम्यान, आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.