ढाका : शेख हसिना यांना सत्तेवरून पायउतार केल्यानंतर बांगलादेशात अंतरिम सरकारचे मोहम्मद युनूस हे प्रमुख आहेत. ढाका येथे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची भेट घेतल्यानंतर युनूस यांनी माहिती दिली आहे. मात्र अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरू असल्याचे सांगितले गेले. तर दुसरीकडे बांगलादेश सरकार भारताचा शत्रू पाकिस्तानसोबत जवळीकता वाढवत असल्याने शस्त्रांची खरेदी करत आहेत. मात्र, अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी वंशाचे व्यापारी साजिद तरार यांनी बांगलादेशच्या सीमेजवळ अल- जिहाद अल जिहादच नारे देण्यात आल्याचे सांगितले आहे.
बांगलादेश आपल्या शेजारी असलेल्या भारतासोबत घनिष्ठ संबंध असल्याच्या चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशत पसरवण्याचा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशातील सरकार बदलल्यानंतर बांगलादेशी हिंदूंवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी वंशाचे व्यपारी आणि पाकिस्तानातील आर्थिक तज्ज्ञ साजिद तरार यांनी भारताला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
साजिद तरार म्हणाले की, भारत आणि बांगलादेशच्या सीमेजवळ अल- जिहाद अल जिहादच नारे देण्यात आलेले दिसून आले. बांगलादेश सीमेजवळ देण्यात आलेल्या नाऱ्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. याप्रकरणी आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानला २५,००० टन साखरेची ऑर्डर दिली आहे, पण मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची मागणीही करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.
ते म्हणाले की, भारताला पूर्णपणे तयार रहावे लागेल. तसेच दहशतवादी कारवायांवर कठोर कारवाई केली जाईल, कारण भारतीय सीमेलगत दोन्ही बाजूला जिहादाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तरार म्हणाले की, बांगलादेशने पाकिस्तानकडून ४० टीन आरडीएक्स, २८ हजार अधिक तीव्रतेचे प्रोजेक्लाईलचा पुरवठा मागितला आहे.
भीती व्यक्त करत असताना तरार म्हणाले की, मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील लोकांसाठी पाकिस्तानींसाठी व्हिसा नियमही शिथिल केले आहेत. याआधीही कोणत्यागी पाकिस्तानील नागरिकास व्हिसा मिळवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. आता हा नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे इस्लामिक दहशतवादी बांगलादेशात सहजपणे घुसखोरी करतील त्यानंतर ते सीमा ओलांडून भारतात प्रवेश करतील, असे बोलले जात आहे.