तरुण लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । अनेकांना भटक्या कुत्रांना विविध खाद्यपदार्थ द्यायला आवडतं, म्हणजे आपल्या घराकडे आलेल्या किंवा व्हॉकिंगला गेल्यावर त्या परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांना अनेक जण खादयापदार्थ देत असल्याचे आपण पाहिलेच असेल, अशीच एक घटना नाशिक मध्ये घडली आहे. कुत्र्यांवर सुरुवातीला झालेली बाचाबाची आणि त्यामध्ये झालेली हाणामारी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहचली आहे.
नाशिकच्या लाटे नगर परिसरात राहणाऱ्या एक महिला आणि त्यांची मुलगी भटक्या कुत्र्यांना बिस्किटे आणि खाद्यपदार्थ खाण्यासाठी देत असल्याने कुत्र्यांची मोठी गर्दी होत असते. महिला आणि मुलगी हे भटक्या कुत्र्यांना खायला देत असल्याने मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा होतात, त्यामुळे परिसरात कुत्र्यांची मोठी वर्दळ होत असल्याने कुत्र्यांनी तीन ते चार मुलांना चावा घेतला आहे. मुलांना चावा घेतल्याने नागरिकांनी महिला आणि मुलीला खाद्यपदार्थ टाकू नका म्हणूनस सांगितले होते, त्यात महिला आणि मुलीने दुर्लक्ष केले होते.
त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी महिलेला सुनावलं होतं मात्र, तरीही महिला आणि मुलीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आक्रमक होऊन मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.