सोयगाव : तालुक्यातील वाढते तापमान लक्षात घेता शहरासह सोयगाव तालुक्यातील सर्व १२० शाळा सोमवारपासून (१७ मार्च) सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० अशी शाळांची वेळ राहणार आहे. हा निर्णय खासगी व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळांनाही लागू राहणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी दिली.
सोयगाव तालुक्याचे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. आगामी काळात पारा चाळिशीपार करेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. परिणामी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बहुतेक शाळांमध्ये वर्षभर दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५, अशी सहा तासांची शाळा भरवली जाते. त्यामुळे मधल्या दोन सुठ्यांचा कालावधी धरून सहा तासांचा अवधी होतो. तो कायम ठेवण्यासाठी सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० ही वेळ निवडली आहे. त्यामुळे आधीच्या कालावधी एवढेच अध्ययन आताही होणार आहे. या निर्णयासाठी शिक्षक संघटनांसह पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी केली होती. या मागणीला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रतिसाद दिला आहे.
सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक व पालकांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. यानुसार शिक्षण विभागाने आता दुपारऐवजी सकाळच्या सत्रात सोमवार, (१७ मार्च) पासून भरणार आहेत.
– रंगनाथ आढाव, गटशिक्षणाधिकारी, सोयगाव
वाढत्या तापमानाने सकाळच्या सत्रातच भरणार सर्व शाळा; शिक्षण विभागाचा निर्णय
by team
Published On: March 17, 2025 5:45 pm

---Advertisement---