---Advertisement---
अल्झायमर्स सारख्या गंभीर आजारावरती आता नवीन औषध बनवण्यात आले आहे. आता या आजाराचा वेग कमी करणार्या नवीन शक्तिशाली औषधाचा शोध लागला आहे. अल्झायमर्सचा सामना करणार्या हजारोंसाठी हा शोध दिलासादायक आहे.
अल्झायमर्सच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असल्याचा दावा तज्ज्ञ करीत आहेत. औषध उत्पादक एली लिली कंपनीने अल्झायमर्सवरील डोनानेमॅब नावाचे औषध आणले आहे. या प्रायोगिक औषधाने आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांमध्ये हळूहळू संज्ञानात्मक घट होण्यास मदत केली, असे औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले.
या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत आणि याला लवकरच अमेरिकेतील खाद्य आणि औषध प्रशासनाची मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे औषध मेंदूमध्ये अॅमिलॉईड प्रथिन तयार करण्यास मदत करते आणि रुग्णांमधील वैद्यकीय घट 35 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचेही दिसून आले आहे.
या प्रथिनाची वेगवेगळी पातळी असलेल्या लोकांचे एकत्रित परिणाम पाहिले असता, या आजाराचा वेग 22 टक्क्यांपर्यंत मंदावल्याचे निष्पन्न झाले. अल्झायमर्सच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी असल्याचे दिसून आले. रुग्णांना उपचारात्मक मूल्य नसलेल्या औषधाच्या तुलनेत (प्लेसबो) पुढच्या पातळीवर असलेल्या रुग्णांना कमी ते काहीच फायदा न झाल्याचेही आढळले आहे.
दुसरीकडे या औषधांचे गंभीर दुष्परिणाम आढळले आहेत. यामध्ये मेंदूवर सूज येणे तसेच मेंदूत रक्तस्राव होण्यासार‘या समस्या आढळल्याआपण आता अल्झायमर्सवर काही बोलू शकू अशी अपेक्षा दिसत असल्याचे लिलीचे डॉ. जॉन सिम्स यांनी अलिकडेच अॅमस्टरडॅममधील अल्झायमर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सांगितले. आपण हा रोग बरा करू शकत नाही. मधुमेहावरही उपचार नाही. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही रुग्णांसाठी फार अर्थपूर्ण उपचार करू शकत नाही, असे सिम्स यांनी सांगितले.
अल्झायमर्सवर उपचार शक्य असलेल्या एका नवीन युगात आपण प्रवेश करीत आहोत, असे अल्झायमर्स रिसर्च यूकेने म्हटले आहे. अल्झायमर्सवरील आण्विक उपचार पद्धतीच्या नवीन युगातील हा पहिला अध्याय आहे, असे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ‘ॅन्सिस्कोच्या मेमरी अॅण्ड एजिंग सेंटरचे संचालक डॉ. गिल राबिनोव्हिकी यांनी जेएएमएच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.