अमळनेर : साहित्य हे जीवनाला दृष्टी देणारे असते : प्रकाश पाठक

अमळनेर : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत असल्याने त्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या  सर्व शाळांच्या शिक्षकांची मीटिंग जी एस हायस्कुल येथे संपन्न झाली. त्यावेळी खा.शि. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, प्रमुख वक्ते प्रकाश पाठक,साहित्य संमेलनाचे समन्वय क डॉ.अविनाश जोशी, खा. शि.मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल,विश्वस्त वसुंधरा लांडगे, व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मराठी साहित्य संमेलन दोन, तीन, चार फेब्रुवारी रोजी प्रताप महाविद्यालयात होणार आहे ७२ वर्षानंतर संधी मिळाली असल्याने आपल्याला १९५१ ला स्थापन झालेले मराठी वाङ्ममय मंडळ प्रताप महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी स्थापन केले. त्याकाळी झालेल्या साहित्य संमेलनाची खूप चर्चा झाली. त्याला १९५२ पासून अखिल भारतीय असे स्वरूप मिळाले. खानदेशचा वारसा पुढे चालवायला नामी संधी आली आहे.
१९५१च्या साहित्य संमेलनाला केवळ सहा हजार रुपये खर्च आला होता.पण यावेळी सहा कोटी रुपये पर्यंत खर्च येणार आहे. येणारे साहित्य संमेलन छोट्याशा गावात असल्याने सर्वांचे लक्ष आपल्यावर असणार आहे. धन,तन,मनाने  या साहित्य संमेलनात पोहचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी समितीत सामील व्हा असे आवाहन आपल्या प्रास्ताविकात डॉ. अविनाश जोशी यांनी केले. डॉ.अनिल शिंदे यांनी खाशी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही चांगली  वागणूक देत असल्याने ते ही छान वागतात. तसेच साहित्य संमेलनाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
खानदेशी लोक ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी उंची गाठण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांना संमेलनाला सहकार्य करू असे आयोजकांना सांगितले नीरज अग्रवाल यांनी आपल्या  मनोगतात संमेलन पत्रिकेत प्रताप महाविद्यालय असा उल्लेख असल्याने त्यासाठी खाशी मंडळाची एक समिती   आपण संमेलनात कसे सहकार्य करतो त्याचे मूल्यांकन करून, कर्मचारी किती व कसा सहभागी होतो त्याचे एक प्रमाणपत्र त्याला देण्यात येणार आहे. येणाऱ्या साहित्य संमेलनाचीजी जबाबदारी आहे मवा मंडळाची  जबाबदारी नसून  त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी खाशी मंडळाची आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. प्रकाश पाठक यांनी महाविद्यालयात हल्ली इव्हेंट होतो. काही कार्यक्रमांचा संस्कार असतो साहित्याच्या क्षेत्रात संमेलन हे खूप महत्त्वाचे आहे. अमळनेरला संमेलन व्हावे म्हणून पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्या गावाचा सांस्कृतिक वारसा बघितला जातो. साहित्य संमेलन विचार व साहित्याची मेजवानी असते.जगातल्या इतिहासाची माहिती घेतली तर काही वेगवेगळे आकर्षाने असतात. साहित्यीक क्षेत्र हे दिशा दाखवणारे असून त्यात शिक्षक रुंद असतो. मग तो कुठलाही असो. साहित्य जीवनाला दृष्टी देणारे असते.
शब्द नेहमी योग्य अर्थाने वापरला जावा पर्यायी शब्द वापरू नये. साहित्य संमेलनाची ओढ असावी लागते.ओढ व आकर्षण यात फरक आहे.अमळनेर चा इतिहास,संस्कृत व कर्तुत्वान माणसांनी भरलेला आहे. दिशा आणि दृष्टी साहित्याच्या पातळीवर उंचीचे व्हावे संस्कार वर्षान वर्ष टिकून राहतात. गाव व्यक्तींमुळे व त्यांच्या योगदानामुळे ओळखले जाते. साहित्यकाने त्यावर संस्कार करायचं असतो. श्रीसूक्तात नमस्तुभ्यम असा उल्लेख २७ वेळा उल्लेख आहे पण एकदाही लक्ष्मी चा उल्लेख नसून त्या श्रीसूक्तात मनोवृत्तीचे उल्लेख आहेत.
चिंता,चिंतन, दृष्टी दिशा लक्षात राहतात. येणाऱ्या गीता जयंतीला साने गुरुजींची गीताई आम्ही धुळे तुरुंगात वाचणार आहोत. अमळनेर शहराला सरस्वती चिंतनाचा इतिहास आहे. झोकून देण्याच्या भूमिकेला न्याय द्यावा. खूप वेळा आपल्याला आपल्या स्वतःच्या  विसर झालेला असतो ती प्रकट करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. प्रतिभा ही नेहमी अंतस्थ असते. प्रतिमा आपोआप बनते. प्रतिभेचे प्रकटीकरण म्हणजे साहित्य संमेलन. कौशल्य एकट असत तेव्हा त्याची ताकद दिसत नाही.साहित्याची भूमिका महत्त्वाची असते.
साहित्यिक म्हणून मांडणी लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा दर्दीच्या ठिकाणी जावे. साहित्यामध्ये सुख या शब्दाला छेद दिला आहे.  साहित्यातून आत्मानंद मिळतो. त्यावेळी खलील जिब्राहिम, स्वामी विवेकानंद यांची उदाहरणे देण्यात आले. माणसे कसे तयार होतात. कामासाठी तयार राहा असे त्यांनी सांगितले गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांमधून  प्रताप हायस्कूलचे किरण सनेर, डीआर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी ,प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पी.बी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी तर आभार जी.एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी वाड्मय मंडळ,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीचे सर्व संचालक, खा.शि. मंडळाच्या सर्व शाळांनी परिश्रम घेतले.