अमळनेर हादरलं! गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

---Advertisement---

 

अमळनेर मधील अमलेश्वर नगर परिसरात काल रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात अरुण सुरेश महाजन यांचा त्यांच्या घरात गोळी लागून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

माहितीनुसार, परिसरातील एका तरुणाकडे गावठी कट्टा होता. तो पाहण्याची विनंती अरुण महाजन यांनी केली असता, कट्ट्यातून अचानक गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या डाव्या खांद्याजवळ लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी भूषण महाजन याला पहाटे अटक केली. फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू करत भूषण महाजन यांच्या घराची झडती घेत काही महत्त्वाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत. तसेच, या गुन्ह्यात वापरण्यात आलेले अवैध शस्त्र कोठून मिळाले आणि शहरात अशा प्रकारची आणखी किती शस्त्रे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---