नवी दिल्ली : अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी सायंकाळी इजिप्तमध्ये आगमन झाले. तब्बल २६ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचे द्विपक्षीय दौऱ्यासाठी इजिप्तमध्ये आगमन झाले आहे. यावेळी शनिवारी सायंकाळी ते कैरोमध्ये दाखल झाले, यावेळी इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मॅडबोली यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री साडेआठच्या सुमारास इजिप्तच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर भारतीय समुदायासदेखील त्यांनी संबोधित केले. रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रँड मुफ्ती यांची भेट घेऊन इजिप्तच्या विचारवंत वर्गासोबतही चर्चा केली.
मोदी याना देण्यात आला पुरस्कार :
पंतप्रधान मोदी याना गार्ड ऑफ ऑनर पुरस्कार देण्यात आलं
मोदी देणार अल -हकीम मशिदीला भेट ती मशीद ११ व्या शतकातील आहे असे बोले जात आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात इजिप्तच्या त्यांच्या पहिल्या भेटीत दाऊदी बोहरा मशिदीलाही भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते हेलिओपोलिस हुतात्मा स्मारकाला भेट देतील आणि पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील. पहिल्या महायुद्धात इजिप्तमधील विविध लढायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या ३,७९९ भारतीय सैनिकांचे हे स्मारक आहे.
हेलिओपोलिस हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांची इजिप्शियन प्रेसीडेंसी येथे भेट घेतील. यानंतर नेते सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील आणि संध्याकाळी ०५:३० वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतील. त्याच दिवशी संध्याकाळी ०६:३० वाजता पंतप्रधान मोदी नवी दिल्लीला रवाना होतील.