---Advertisement---
शुक्रवारी भारताविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी नेहमीच तयार आहे.
शुक्रवारी त्यांनी सोशल मीडिया दूथवर लिहिले होते की, असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनद्वारे गमावले आहे. आशा आहे की त्यांचे भविष्य चांगले असेल. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे विधान शेअर केले आणि एक्सवर लिहिले-मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबद्दलच्या त्यांच्या विचारांचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. ते म्हणाले – भारत-अमेरिकेत सकारात्मक आणि दूरदर्शी धोरणात्मक भागीदारी आहे. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी भारत आणि इतर देशांसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे वर्णन चांगले केले, परंतु युरोपियन युनियनने गुगलवर ३.५ अब्जचा दंड ठोठावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
अमेरिकेसोबतच्या भागीदारीला विशेष महत्त्व : जयशंकर
ट्रम्प यांच्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, पंतप्रधान मोदी अमेरिकेसोबतच्या आमच्या भागीदारीला खूप महत्त्व देतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे (पंतप्रधान मोर्दीचे) ट्रम्प यांच्याशी नेहमीच खूप चांगले वैयक्तिक संबंध राहिले आहेत.