अमेरिकेची ग्रॅबिएल ठरली मिस युनिव्हर्स

 

तरुण भारत लाईव्ह ।१६ जानेवारी २०२३। अमेरिकेची आर. बॉने ग्रॅबिएल २०२२ ची ‘मिस युनिव्हर्स’ ठरली आहे. या मुकुटाची प्रबळ दावेदार असलेली भारताची दिवीता राय पहिल्या पाच मध्ये स्थान मध्ये मिळवण्यात अपयशी ठरली. अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू आर्लीन्स शहरात ही ७१ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मानाच्या मुकुटासाठी टॉप ३ स्पर्धकांची निवड करण्यात आली. व्हेनेझुएला, अमेरिका आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धकांना या टॉप ३ स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळाले.

या स्पर्धेतील ८४ सुंदरींना मागे टाकत अमेरिकेच्या बॉने ग्रॅबिएलने विजेतेपद पटकावले.व्हेनेझुएलाची डायना सिल्वा दुसऱ्या तर, डोमिनकन रिपब्लिकची पेना तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत भारताची निराशा झाली आहे. मिस युनिव्हर्स २०२२ असलेली भारतीय स्पर्धक दिवीता राय पहिल्या पाचमध्ये पोहोचू शकली नाही.

या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिवीता रायने आपल्या वेशभूषेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ती सोनेरी ड्रेस परिधान करून आली होती. व्यवसायाने मॉडेल असलेली दिवीता राय कर्नाटकाची रहिवासी असून, तिने आर्किटेकमध्ये शिक्षण झाले आहे.

मुकुटाची किंमत 

मिस युनिव्हर्स २०२२ च्या मुकुटाची किंमत ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ४९ कोटी रुपये आहे. यावेळचा मुकुट खूपच खास असल्याचे बोलले जात आहे. ‘फोर्स फॉर गुड’ नावाचा हा मुकुट मौवाड नावाच्या कंपनीने तयार केला आहे. हा मुकुट दर्शवतो कि महिलांनी तयार केलेले भविष्य शक्यतांच्या मर्यादेपलीकडे आहे.

स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची कामगिरी 

१९९४ मध्ये सुरु झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन वेळा मानाचा मुकुट जिंकला आहे.तेव्हा बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने हा किताब जिंकला आणि भारताची पहिली मिस युनिव्हर्स बनली. त्यांनतर लारा दत्ताने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. २०२१ मध्ये हरनाज संधूने भारताच्या शिरपेचात तिसरा किताब  होता.