अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबामध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळते आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये बिनसल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांचा घटस्फोट होणार असल्याचेही बोलले जातेय. अजून एक चर्चा अशी आहे की, अभिषेक सध्या त्याच्या ‘दसवी’ सिनेमातील सहकलाकार म्हणजेच निम्रत कौरला डेट करतोय.
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायच्या डिवोर्स च्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक हे 2007 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. ऐश्वर्या आणि अभिषेक हे आत्ता घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सर्वदूर रंगल्या आहेत.
नुकताच एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या उपस्थित होती. तेव्हा अभिनेत्रीने बच्चन ऐवजी फक्त ‘ऐश्वर्या राय’ अशा नावाने स्वतःला संबोधित केलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ब्लॉगच्या माध्यमातून मौन सोडलं होतं. ‘तर्क फक्त तर्क असतात… त्यामध्ये काहीही तथ्य नसतं…’ असं बिग बी म्हणाले होते.
आता देखील बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांनी ‘चूप’ हाच एक शब्द ट्विट केला आहे. शिवाय पुढे राग येणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. ऐश्वर्या राय हिने नावापुढील बच्चन आडनाव हटवल्यानंतर बिग बी यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी हे ट्विट केलं आहे.