भाजपाचा प्रचारासाठी पॉवर प्लॅन; अमित शाह महाराष्ट्रात ठोकणार तळ, जाणून घ्या कुठे कुठे घेणार सभा ?

Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी काल मंगळवार, २९ ऑक्टोम्बर रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच तारांबळ उडाली. आता सर्वत्र प्रचाराला सुरवात झाली असून, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीकडूनही जोरदार नियोजन करण्यात आले आहे.

येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकूण ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले असून, ही निवडणूक एकाच टप्पात पार पडणार आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी काल मंगळवार, २९ ऑक्टोम्बर रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच तारांबळ उडाली. आता सर्वत्र प्रचाराला सुरवात झाली असून, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीकडूनही जोरदार नियोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा घेणार आहेत.

भाजपकडून १०० (शंभर) हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा पार पडणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही महाराष्ट्रात १५ सभा होणार आहेत. तसेच गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाहांच्या होणार आहेत. अमित शाह हे महाराष्ट्रात २० सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत. या सभांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिवाळीनंतर भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे बोललं जात आहे.