अमिताभ बच्चन यांनी सांगितले ‘ती’ परंपरा मोडण्याचे कारण!

तरुण भारत: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांची गर्दी जमते. अमिताभ बच्चनही दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटत असतात. कोरोना काळ वगळता या प्रथेत अद्यापही खंड पडलेला नाही. आत्तापर्यंत बच्चन  नेहमी अनवाणी किंवा मोजे घालून  प्रेक्षकांना भेटायला येत यावेळी मात्र, ते बूट घालून आले. आता त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हा नियम मोडण्याचे कारण दिले आहे. मागे त्यांनी सांगितले होते की ते त्यांच्या  चाहत्यांना शूजशिवाय का भेटतो.

अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्यासाठी  शूजशिवाय बाहेर पडत असे. यावेळी त्यांच्या पायात शूज दिसले. बिग बींनी ब्लॉगमध्ये याचे कारण लिहिले, …आणि आज खूप फरक पडला…  कारण काल ​​मी दिवसभर अनवाणी शूट केले. त्यामुळे पायावर फोड  आले होते…  त्यामुळे मी काळजी घेत आहे…म्हणूनच मंदिर आजही मंदिर आहे आणि पुढच्या वेळी आदर राखला जाईल. आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी ते अनवाणी का जातात हे अमिताभ बच्चन यांनी आधीच सांगितले आहे. त्यांनी लिहिले होते, काही लोक कधी कधी टोमणा मारतात की कोण मोजे घालून किंवा अनवाणी पायांनी बाहेर जातो… मी म्हणतो, मी जातो. तुम्हाला यात काही अडचण आहे का? तुम्ही अनवाणी मंदिरात जाता का? माझे हितचिंतक माझे मंदिर आहे.महानायक आपल्या चाहत्याना देव मानता