अमरावतीच्या एसीपीची आत्महत्या,वाचा सविस्तर

अमरावतीमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीपी भरत गायकवाड हे सध्या अमरावती येथे कार्यरत होते. या घटनेपूर्वी ते पुण्यातील त्यांच्या घरी आले होते. त्याने रात्री उशिरा पत्नी आणि पुतण्यावर अचानक गोळ्या झाडल्या. चतु:श्रृंगी पोलिसांनी सांगितले की, बाणेर भागातील एसीपी भरत गायकवाड यांच्या घरात सोमवारी पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी पहाटे 3.30 च्या सुमारास एसीपीने प्रथम पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर गोळीचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यांनी दरवाजा उघडताच एसीपीने त्यांच्या भाच्यावर गोळीबार केला, ज्जी त्याच्या छातीत लागली. त्यानंतर गायकवाड यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. यादरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीपी भरत गायकवाड यांच्या पत्नी मोनी गायकवाड (४४) आणि भाचा दीपक (३५) अशी अन्य दोन मृतांची नावे आहेत. मात्र, खून आणि त्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.