विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आदर्श आचारसंहिता पालनासाठी सहा आंतरराज्य तसेच दहा आंतरजिल्हा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले असून, निवडणूक काळात दोन कोटी ९४ लाख २९ हजार ८४८ रकमेची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच सहा कोटी सहा लाख रुपयांची जप्ती कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक काळात तीन जिल्ह्यांच्या सीमेवर इन एएससी नियुक्त करण्यात आले आहेत.
वाढीव पोलीस बंदोबस्त
निवडणूक अंतर्गत जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे यात ६ सीएएसएफ ३ आयटीबीपी त्या तुकड्या मागविण्यात आले आहेत. याशिवाय तीन हजार होमगार्ड जवान सहा सीएएसएफ आणि सहा सीआरपीएफच्या तुकड्या येणार आहेत.
नॉन बेलेबल वॉरंट
१५१४ जणांवर नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले आहेत हे तसेच ९१ लाख ८७ हजार रुपयांची रोख रक्कम सीमा सुरक्षा तपासणी नाक्यांवर जप्त करण्यात आली आहेत.
स्ट्रॉग रुमवर कडेकोट सुरक्षा
स्ट्राँग रूम ईव्हीएम मतदान मशीन ठेवण्यात येत आहेत त्या ठिकाणी सीआरपीएफ एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याचेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
५४ उमेदवारांना पोलीस सुरक्षा
जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत १३९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत यापैकी ५४ उमेदवारांना प्रशासनाच्या पाहणी निष्कर्षानुसार व नियुक्त समितीच्या निष्कर्षानुसार १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रचार संपेपर्यंत पोलीस सुरक्षा देण्यात येणार आहे. यात मुक्ताईनगरमधील सात जळगावमधील पाच आणि पाचोरा येथील १२ अशा ५४ उमेदवारांना निवडणूक प्रचार संपेपर्यंत पोलीस संरक्षण राहील.
२७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्यात आचारसंहिता काळात जळगाव, चाळीसगाव, चोपडा येथे देशी कट्टे जप्त करण्यात आले आहेत, तर २७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. २८६ जणांवर प्रोफेशन एक नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पाच जणांविरोधात तडीपरीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ५० जणांचे आदेश प्रस्तावित आहेत. एमपीडीए अंतर्गत तीन आदेश निर्गमित करण्यात आले असून तीन प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.