नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाश येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज स्थानिक नागरिक आणि इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही मूर्ती नेमकी कोणत्या देवाची हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मूर्ती सापडल्यानंतर नागरीकांची पुजेसाठी गर्दी केली असून याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रकाशाची दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. या ठिकाणी अनेक वेळा खोदकाम करताना पुरातन वस्तू सापडले आहेत. पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना पुरातन ही मूर्ती सापडली. ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती ध्यानस्थ अवस्थेत असून तिच्या चारी हातात शस्त्र आहेत. यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारीही या ठिकाणी भेट देणार आहेत.