Agriculture : जळगाव जिल्ह्यात पेरणीयोग्य पावसाअभावी सरासरी ३० टक्के पेरणी

जळगाव : जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरूवातीला मान्सूनने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री सुमारे दहा साडेदहाच्या सुमारास ढंग आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसात पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जिल्हाभरात मान्सूनने ५ ते ७ जून दरम्यान वळवाच्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी शेतजमीनीची मशागतीस चालना मिळाली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९९.५ मिलीमिटरसह ११२.७ टक्के पाऊस झाला आहे. तसेच किमान ७० मि.मी पेरणीयोग्य पाऊस आणि ओल असल्याशिवाय शेतकयांनी पेरणी करू नये, असे कृषी विभागाने जूनच्या सुरूवातीलाच आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यत जिल्ह्यात सरासरी ३०.४८ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली असून उस वा केळीचे बागायती क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रात समाधानकारक वा पेरणीयोग्य पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

कमी अधिक प्रमाणात पर्जन्यमान
यंदा चांगला पाऊस होणार या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाच्या विविध पीकांची पेरणी केली. मात्र, काही तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दरम्यान बऱ्याच तालुकापरिसरात पाऊस सर्वदूर सारखा नसून कमी अधिक प्रमाणात आहे.

वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू
जळगाव शहरासह जिल्ह्यात काही तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री दहा साडेदहाच्या सुमारास ढग आणि वीजेचा कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात जळगाव शहरात दोन अडीच तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र नदीनाले खळाळून वाहिले असून या पावसामुळे रस्ते स्वच्छ धुवून निघाले. तर पारोळा तालुक्यात शिरसोदे येथील दामू लखा भिल याच्या १५ शेळ्यांचा वीज पडून मृत्यू झाला.

जळगाव सरासरी ३० टक्के पेरण्या पूर्ण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्याची जून महिन्यात १२३.७ मि.मी. पाऊस अपेक्षीत असून आतापर्यत ९९.५ मिलीमिटर अर्थात ११२.७ टक्के सरासरी पावसाने सरासरी गाठली आहे. तसेच किमान ७० मि.मी पेरणीयोग्य पाऊस आणि ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे कृषी विभागाने जूनच्या सुरूवातीलाच आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३० टक्के पेरणी पूर्ण झाली असून आगामी सप्ताहात समाधानकारक पाऊस झाल्यास खरीपाच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता असत्याचेही दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप लागवड
जिल्ह्यात बागायती व कोरवाहू कपाशी वाणाची ५ लाख १ हजार ५६८ हेक्टरवर लागवडीचा अंदाज होता. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ४ हजार ४६४.१० हेक्टरवर कपाशी वाणाची तर ज्वारी ७४९ हेक्टर, बाजरी ६६३.५, मका २० हजार ५०७, अन्य २४८ हेक्टर असे २२ हजार १६७.३५ हेक्टर तर, तूर २हजार ५३५.९, मूग १हजार ८१९, उडीद १हजार २७९, अन्य ९७ हेक्टर असे दाळवर्गीय व अन्नधान्य वर्गीय वाणांची २७ हजार ८९८.३ म्हणजेच ११.९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टरपैकी सरासरी २ लाख ३४ हजार ५९१.९५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३०.४८ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली असून उस वा केळीचे बागायती क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रात समाधानकारक वा पेरणीयोग्य पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

 

भरारी पथके तैनात
जिल्ह्यातील शेतकयांना खरिपासाठी • लागणाऱ्या बी बियाणे तसेच खतांचा साठा म बलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे, बी बियाणे वितरक यांची भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी होत आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खतांच्या संदर्भात कोणती तक्रार असेल, तर तालुका कृषी अधिकारी यांची संपर्क साधावा.

– कुरबान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक.