मुंबई : विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३ व्या मजल्यावरू कोसळली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, काही कामगार लिफ्टखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३ व्या मजल्यावरू कोसळली.
घटनेवेळी लिफ्टमध्ये चार कामगार बसलेले होते. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून, इतर तीन कामगारांना वाचवण्यात स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
दरम्यान, इमारतीत सुरू असलेल्या लिफ्टचे काम अनाधिकृत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.