जळगाव: नशिराबाद गावाजवळील पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या मजुरांना रात्री एका अज्ञात वहानाने चिरडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असताना अज्ञात वाहणाने एकाच वेळी तिघांना चिरडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आले आहे. या त तीनही मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. दरम्यान या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे. या तिघांना झोपेतच वाहनाने चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.