स्वार होऊन चालविण्याचा बालपणीचा, आनंददायी, मजेशीर अनुभव प्रत्येक मुला-मुलींना मनुष्याला आलेला असतो. हलकं फुलकं, कमी खर्चिक बालपणापासूनच चारचाकी, दुचाकी, सायकल वाहन आपण अनुभवलेलं असतं. म्हणूनच हा विषय महाआनंद, अत्यानंद असतोच. हा विषय बालपणीचा असल्याने मोठेपणी यावर लिहिलेली कविता, लेख, अनुभव यावर केलेले लेखन-वाचन करण्यास, ऐकण्यास आवडतेच.
‘सारा गाव चालवतोय सायकल’, हे साधन प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील असे असते. हा प्रसंग, सर्वांचा हृदयाजवळचा असतो. हायस्कूलचे शिक्षण घेण्यासाठी सर्वांना सायकलची गरज लागते. होती/असते. विविध कंपन्यांपैकी हिरो, एटलॉस यापैकी. एक सायकल घेऊन रोजचे शिक्षण पूर्वी घेत होते. सायकल म्हणजे जीवलग मित्रासम दुसरा मित्रच असतो. मराठी, हिंदी चित्रपटात हिरो हिरॉईन गाणी सायकलवर एकत्र बसूनच सैर करता करता धुंदीत गाणे गात होते.
पोलीस वाल्या
सायकल वाल्या
बेरक्या लावून
थांब….
हे गाणे शब्बीरकुमार/उषा मंगेशकर यांचे खूप गाजले होते.
लहान मोठ्ठी कंपनीत, व्यवसाय, नोकरी, सरकारी नोकरी सुरू झाली की मग लागलीच. पटकन विचार केला जातो तो मोटारसायकल घेण्याचा. कारण लांब जावे लागते. वेळेवर पोहचावे लागते म्हणून ती निकड होते. गरज होते. मोटारसायकल घेण्यासाठी बँक कर्ज देते व आपल्या पसंतीची मोटारसायकल उपलब्ध होते. माणसांच्या कमाईची प्रगती हळूहळू होत असते. ती बर्यापैकी वाढली की स्वतः मोटार सायकल घेतो. शहरामध्ये मुलं-मुली शिक्षणासाठी, ट्युशनसाठी लांब जावे लागते म्हणून दुसरी गाडी, तिसरी गाडी घेतली जाते.
कुटुंब शिकून सवरून मोठे झाले समजदार झाले की नोकरी, कामं शोधून ते मनासारखे मिळाले की मग घरात हळूहळू येणारा पैसा वाढतो. आपल्या दैनंदिन गरजा भागवून काही रुपये बँकेत सेव्हिंग केले जाते व ते वाढले की नवं घर, प्लॉट, शेत घेतलं जातं. कुटुंब वाढतं. मग गरजा अपेक्षा, हेवा वाढतो. सर्व कुटुंब सेटल झालं की, आपल्या दैवताचे देवदर्शन, यात्रा, जत्रा, वारी केली जाते. बस, रेल्वेप्रवास डोकेदुखी, अवघड, वेळखाऊ, खर्चिक वाटायला लागतो. नवीन वाहन कार घेण्याचा सर्व सदस्यांचा विचार होतो.
आपण कार घेऊ या का? मुलं-मुली, आई आपण कार घेतली पाहिजे, ही कुटुंबाची गरज होऊन जाते. श्रीमंत लोकांची उच्च अपेक्षा होते. कारण उत्पन्नात भरमसाठ वाढ होतच जाते. चार लाखाची कार विकून सात लाखांची, सात लाखांची कार विकून १५ लाखांची घेतली जाते, हा अपेक्षा शौकीचा आलेख उंचच उंच वाढतच जातो. बाकीच्या कार विकल्या जातात.
सर्वसामान्य, साधारण लोक कारची हौस जुनी कार घेऊन ती पूर्ण करतात. चांगली कंडिशन पाहून खरेदी करतात. मग ते ग्राहक या कार बाजारात जाऊन लोक आपली गरज हौस भागवून घेतात. आजच्या घडीला तर नवनवं तंत्रज्ञान येत आहे.ई-कार हे नवीन कार आपले प्रदर्शन मांडण्यात सरसावली आहेच. जनतेच्या अपेक्षा, विचार पध्दती, विचार वाढत आहेत.तसा कारबाजार सावरत आहे. वाढत आहे. नवनवं तंत्रज्ञानात भर पडून नवनवीन कार मार्केटमध्ये येत आहेत. जाहिरात येत आहेत. लोकांची अपेक्षा उंच डोंगरासारखी वाढत आहे. वाहन घेण्याची अपेक्षा पाण्याच्या प्रवाहासारखी खळखळत, गतीने वाढत आहे. सायकलचा आनंद विस्मृतीत जाऊन इतिहास जमा झाला आहे.
गोविंद रामदास पाटील
८७८८३३४८८२